श्रीरामपूर येथील साई श्रद्धा कॉलनीतील दोन महिन्यांपासूनची बिबट्याची दहशत अखेर संपली आहे. वनविभागाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने एका बिबट्याच्या पिल्लाला जेरबंद केले. या परिसरात मादी बिबट्या आणि इतर पिल्ले असल्याने, उर्वरित बिबट्यांना पकडण्यासाठी मोहीम सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.