गोदावरी तीरी वसलेल्या योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या सरलाबेट आश्रमातून पंढरपूरकडे पायी दिंडीचे मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले आहे. 200 वर्षांची परंपरा असलेल्या या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी झाले असून श्रीरामपूर शहरात या पालखीचे काल जल्लोषात स्वागत झाले...