पंढरपुरात श्रीयाल षष्ठी निमित्त पारंपारिक पद्धतीने गौरदेवतेची मिरवणूक काढण्यात आली. परंपरेप्रमाणे विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा स्वतंत्र गौर सोहळा पंढरपूर शहरातून निघाला होता. माहेरवाशिनीचे प्रतीक असलेल्या हत्तीवर शंकर-पार्वतीची मूर्ती अरुढ असलेल्या देवतेला श्रावण महिन्यात पूजन केले जाते. यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून चंद्रभागेत विसर्जन केले जाते.