बीड शहरात सलग दीड तास जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे नगरपालिका प्रशासनाची पोलखोल झाली आहे. पालिका प्रशासनाच्या माध्यमातून 15 दिवसांपूर्वी शहरातील प्रमुख चार चौकांमध्ये नव्याने सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली होती. परंतु अवकाळी पावसामध्ये सिग्नल सुरू होण्याआधीच नगर नाका परिसरातील सिग्नल कोसळला आहे.