दिवाळीची सुट्टी आणि वीकेंडचा आनंद लुटण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या पर्यटकांनी ताज्या माशांच्या खरेदीसाठी हर्णे बंदराला पसंती दिली आहे. मात्र, माशांच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडलं आहे. माशांची घटलेली आवक आणि वाढलेली पर्यटकांची संख्या यामुळे दरांनी उच्चांक गाठला आहे.