शीख धर्मियांचा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा पवित्र मनमाड गुरुद्वारात शीख धर्मियांचे धर्मगुरू श्री गुरू गोविंद साहेब यांच्या ३५८ व्या जयंतीनिनिमित प्रकाश पर्व साजरा केले जात आहे.त्यानिमित्त सालाना जोडमेल्याचे आयोजन करण्यात आले.अखंड पाठाच्या समाप्तीनंतर. गुरु- दा-गद्दी ग्रंथ साहेबांची मिरवणूक काढण्यात आली.पंच प्यारे, पंच निशाण,भजनी मंडळ मिरवणुकीच्या अग्रभागी होते.मिरवणुकीतील लाठी-काठी, दांड-पट्टा, तलवारबाजीचे चित्त थरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.अनेक वर्षापासून सालना जोडमेल्याची परंपरा सुरु आहे. देशभरातील शिख भाविकांनी हजेरी लावली होती. शहरातील विविध संस्था संघटनातर्फे जोडमेल्याचे स्वागत करण्यात आले.