हृदयामध्ये केवळ हृदयविकाराचा झटकाच नाही, तर अनेक सायलेंट किलर आजार असतात, ज्यांची वेळेवर ओळख होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हृदयाच्या झडपांचे आजार, विशेषतः रूमॅटिक हार्ट डिसीज, तरुण वयात २० ते ३० वर्षांदरम्यान होऊ शकतात. हे आजार अनेकदा लक्षणे दाखवत नाहीत पण गंभीर परिणाम घडवतात, त्यामुळे त्यांची वेळीच तपासणी आवश्यक आहे.