सोन्याच्या तुलनेत चांदीची कहाणी वेगळी आहे. ती केवळ गुंतवणुकीसाठीच नव्हे, तर उद्योगांसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. उत्कृष्ट विद्युत आणि औष्णिक वाहक असल्याने सोलर पॅनेल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक वाहने आणि एआय हार्डवेअरमध्ये तिचा वापर वाढला आहे. त्यामुळेच चांदीची मागणी गुंतवणूकदार आणि उद्योगांकडून सातत्याने वाढत आहे.