वर्ध्यातील जय पवनसुतनगर जुनी म्हाडा कॉलनी येथील श्री राम, श्री हनुमान मंदिरात हनुमंताला चांदीचे सिंहासन अर्पण करण्यात आलं आहे. हा जय पवनसुत हनुमान मंदिर ट्रस्टचा उपक्रम असून अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्ताने जय पवनसुत हनुमान मंदिर ट्रस्टचा पुढाकार आणि भक्तांच्या सहकार्याने हनुमंताला चांदीचे सिंहासन अर्पण करण्यात आलं आहे. याप्रसंगी भक्तांकडून जय श्रीराम, जय हनुमानाचा जयघोष करण्यात आला.