सिंधुदुर्गातील पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली येथील धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात आला आहे. सह्याद्री पट्ट्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वनविभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.