मुंबई गोवा महामार्गावरील पावशी या ठिकाणी हायवेवर रस्त्याला तडे गेले आहे. जिल्ह्यामध्ये 66 हायवेवर अशाच प्रकारची परिस्थिती सगळीकडे पाहायला मिळत आहे.त्यामुळे हायवेच्या कामासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हायवे ठेकेदाराकडून तात्पुरत्या स्वरूपाचे तडे बुजवण्याचे काम करण्यात आले होते. मात्र, केलेली मलमपट्टी कुठेतरी निष्फळ ठरताना पाहायला मिळते. हायवे ठेकेदाराने तात्काळ दखल घेऊन तडे बुजवावे अशी मागणी वाहन चालकांकडून होताना पाहायला मिळते.