सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यात दुर्मीळ ‘स्लेंडर लॉरिस’ अर्थात वन मानवाचं दर्शन झालं आहे. वन मानवाचा वावर कायम घनदाट जंगलात असतो. वनमानव हा लाजाळू प्राणी असल्याने त्याला लाजवंती असं देखील म्हटलं जातं. मुळात याला पहिल्यांदा पाहिल्यानंतर माणसाचे लहान बाळ आहे, असाच काहीसा भास होतो.