देवगड स्पोर्ट्स क्लब आणि देवगड एंग्लर्स यांच्या संयुक्त विद्यमाने “भव्य मासेमारी स्पर्धा “देवगडच्या मीठमुंबरी बीच येथे आज मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये कोकण, गोवा आणि कर्नाटकमधील एकूण ३० स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास मंत्री नितेश राणे यांची मुख्य उपस्थिती होती. स्पर्धेतील विजेत्यांचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.