तळकोकणात वादळी वाऱ्यासह आणि गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, तालुक्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी भातशेती कापली होती, ती भातशेती भिजली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.