समुद्रातील मासेमारी बंदीचा कालावधी संपल्यानंतर कालपासून मासेमारी हंगामाला सुरूवात झाली आहे. मासेमारी हंगामाच्या पहिल्याच दिवशी वेंगुर्ल्यातील मच्छिमारांना कोळंबी माशांचा बंपर कॅच मिळून आला आहे. हंगामातील पहिल्याच जाळीत एवढ्या मोठ्या प्रमाणात कोळंबीचा कॅच हाती आल्यामुळे सुरूवात चांगली झाल्याने मच्छीमार आनंदीत झाला आहे. सध्या श्रावणमास सुरू असल्यामुळे माशांचा दर कमी आहे. त्यामुळे या कोळंबीला 200 रूपये किलोचा भाव मिळाला आहे.