वटपौर्णिमा सण दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यासाठी फणस हे महत्वाचं वान मानलं जात. त्यामुळे कोकणातून मुबंईला विक्रीसाठी फणस घेऊन जाताना व्यापारी वर्ग पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात फणस विक्रीसाठी मुंबई, ठाणे शहरात जात असतात. यावर्षी फणसाचे पीक कमी असल्याने त्याचे दरही वधारले आहेत.