सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील अणाव बामणवाडी मधील अजित अणावकर यांच्या घराशेजारी आज दुर्मिळ खवले मांजर आढळून आले. अणावकर यानी ही माहिती वनपाल यांना दिली. त्यानंतर वन क्षेत्रपाल यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागातील कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत त्या खवले मांजराला जेरबंद केले.