सिंधुदुर्गात दोन दिवसापासून पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासू लागला होता. आज सकाळपासून कणकवलीतील हिंदुस्तान पेट्रोलियम पंपावर पेट्रोल- डिझेल उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या वाहन चालकांच्या पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्या मिरजवरून पेट्रोल- डिझेलचा पुरवठा होत आहे, परंतु वाढती मागणी पाहता मिरज डेपोमध्ये पेट्रोल-डिझेल वाहतूक करणाऱ्या गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे ग्राहकांना फटका सहन करावा लागत आहे.