सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. काल रात्री पासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू असून आजही ढगाळ वातावरण आहे. काही भागात सकाळी पावसाच्या तुरळक सरी सुरू आहेत. मागील चार दिवस पावसाने उघडीप घेतली होती.