दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे मुख्य रस्त्यावर ‘बाहुबली’ नावाचा टस्कर हत्ती अचानक अवतरल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. ऐन वर्दळीच्या वेळी हत्ती थेट रस्त्यावर आल्याने ग्रामस्थ, वाहनचालक आणि शालेय विद्यार्थ्यांची काही काळ अक्षरशः घाबरगुंडी उडाली. हत्ती रस्त्यावरच ठाण मांडून राहील्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.