पुणे-मुंबई पुरता मर्यादित असलेला स्टन्टचा थरार आता कोकणातील रस्त्यांवरही पाहायला मिळत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीस्वार धोकादायक पद्धतीने दुचाकी चालवताना सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. MH 07 AQ 9028 क्रमांकाच्या दुचाकीवरून दोघेही बेदरकारपणे प्रवास करताना दिसत आहेत. स्वतः च्या प्राणासह इतर वाहनचालकांच्याही जीवाला धोका निर्माण करणाऱ्या या दोन्ही दुचाकीस्वारांवर पोलिस कारवाई होणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.