सिंधुदुर्गाच्या कणकवलीमध्ये अचानक आज झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडाली पाहायला मिळाली. कणकवलीचा आज आठवडी बाजार असल्यामुळे आणि अचानक झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी दुकानाच्या निवाराचा आधार घ्यावा लागला. सध्या जिल्ह्यात गेले काही दिवस उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढलेली पाहायला मिळाले त्यामुळे झालेल्या अचानक पावसामुळे थोडासा वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे.