सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डेमध्ये शेतीच्या कामांना सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात दोन दिवस पावसाने दमदार सुरुवात केली. त्यानंतर पावसाचा वेग मंदावलेला पाहायला मिळाला.सध्या ऊन पडलेले असून जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.