तळकोकणात गणेश चतुर्थीची धूम पाहायला मिळतेय. बाजारपेठेत खरेदीसाठी लोकांची गर्दी झालेली दिसून येत आहे. गणपतीच्या सजावटीसाठी रंगबेरंगी फुले आणि फळे बाजारात आणण्यात आली आहेत. स्थानिक शेतकरी पावसात उगवणारी फुले आणि फळे बाजारात विक्रीसाठी घेऊन आले आहेत. माटवीला सजवण्यासाठी या फुला फळांचा वापर केला जातो.