प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी सहपरिवार साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. साई दरबारात आल्यानंतर भजन गाण्याचा मोह त्यांना आवरला नाही. आपल्या सुरेल आवाजात त्यांनी साईभजन सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.