सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील चिने वस्तीत बिबट्याच्या सततच्या वावरामुळे ग्रामस्थ भयभीत होते. ऊस शेती कामातही अडथळे येत होते. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून ७-८ वर्षांच्या नर बिबट्याला जेरबंद केले. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, वनविभागाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.