भुसावळमधील हतनूर धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून 8 हजार 970 क्यूसेकने तापी नदीत पाण्याचा विसर्ग होत आहे. हतनूरचा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईतून दिलासा मिळाला आहे.