शिंदे गटात गेलेल्या खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात उबाठा सेना रस्त्यावर आली आहे. उबाठा सेनेतून शिंदे गटात गेलेल्या वाकचौरे विरोधात उबाठा सेना आक्रमक झाली आहे. श्रीरामपूर राहुरी मार्गावरील बेलापूर येथे उबाठा सेनेने रास्ता रोको केलं. भाऊसाहेब वाकचौरे विरोधात संतप्त शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली, एवढंच नाही तर, त्यांच्या फोटोला चपलांचा हार घालत जोड्याने मारण्यात आलं.