कल्याण पूर्व येथील भाजप आंदोलनात बंगालीत घोषणाबाजी करण्यात आली. जॉल चाय.. जॉल चाय ... जल हमारी जीवन अशा प्रकारची बंगालीमध्ये घोषणाबाजी भाजप आंदोलनात दिसली. एकीकडे महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा पेटला असताना भाजपच्या कल्याण पूर्व येथील पाणी मोर्चा बंगालीमध्ये घोषणाबाजी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.