बर्नस्टीनच्या अहवालानुसार, आयपीओचा आकार जितका लहान असतो, तितका परतावा जास्त मिळतो. १७० कोटींपेक्षा कमी इश्यू आकार असलेल्या आयपीओंनी सरासरी ४०% परतावा दिला आहे, तर मोठ्या आयपीओंनी केवळ ९% दिला. लहान आयपीओ अधिक फायदेशीर असले तरी त्यात जास्त धोकाही असतो.