राज्य परिवहन महामंडळाचे जिल्ह्यातील सातही आगारात नादुरुस्त बसेस मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धावताना दिसत असून यामधून मोठा धूर उत्सर्जित होत असल्यानं प्रवाशांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या नादुरुस्त बसेसमुळे महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही धुराचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.