जळगावच्या पाचोरा शहरातील सप्तशृंगी नगर परिसरात एका कारच्या बोनेटमध्ये विषारी जातीचा सर्प आढळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित कार वॉशिंगसाठी दुकानावर आणल्यानंतर वॉशिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुढील चाकाच्या वरच्या भागात, बोनेटमध्ये विषारी सर्प लपून बसल्याचे निदर्शनास आले.