येवला नगर परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रात्रीच्या सुमारास नाग दिसल्याने कर्मचाऱ्यांनी घाबरून न जाता तातडीने सर्पमित्र दीपक सोनवणे यांच्याशी संपर्क साधला माहिती मिळताच दीपक सोनवणे यांनी त्वरित नगर परिषद परिसरात धाव घेतली, नागाचा शोध घेत अत्यंत काळजीपूर्वक आणि सुरक्षित पद्धतीने त्याला रेस्क्यू केलं.