सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा जवळ आल्याने संपूर्ण शहर उत्साहात आहे. या यात्रेच्या स्वागतासाठी ऐतिहासिक सिद्धरामेश्वर मंदिराला भव्य आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कैलासद्वार, संमती कट्टा, यात्री निवास आणि सिद्धेश्वर तलावाभोवतीचा परिसर रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघाला आहे. या मनोहारी दृश्यामुळे सोलापुरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.