सोलापूरच्या करमाळा शहरातील तहसील कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयासमोर पावसामुळे चिखल झालेला असून या चिखलातूनच कसरत करीत नागरिकांना कार्यालयात जावे लागत आहे.भूमिअभिलेख कार्यालयासमोर मुरूम टाकून सर्व परिसर चिखलमुक्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.