सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वानेवाडीत शेतकऱ्यांनी ‘शिमगा आंदोलन’ केले. पीक विम्याच्या थकीत परताव्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा दिसला. वानेवाडीच्या मुख्य चौकात शेतकऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन केले. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. विमा कंपन्यांच्या नावाने शेतकर्यांनी शिमगा केला.