सोलापूरच्या दुधणी नगरपरिषदेत मतमोजणीदरम्यान स्ट्रॉंग रूमची चावी हरवल्याने प्रशासकीय ढिसाळ कारभार समोर आला. कुलूप तोडून ईव्हीएम बाहेर काढण्यात आले. मतमोजणी सुरू असताना, महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागांचा तपशील जाहीर झाला आहे. यात काँग्रेसने राष्ट्रवादीपेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली असून, भगूरमध्ये अजित पवारांच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे आघाडीवर आहेत.