सोलापुरातील करमाळा तालुक्यातील कुंभेज येथील मुस्लिम शेतकरी मगन शेख यांनी आपल्या गाईसाठी डोहाळे जेवणाचे आयोजन करून सामाजिक सलोख्याचं आणि प्राणी प्रेमाचं अनोखं उदाहरण सादर केलं आहे.मगन शेख यांनी आपल्या गाईची डोहाळे जेवणासाठी खास सजावट केली. त्यांनी गाईला साडी नेसवून, फुलांचे हार घालून, तिच्या कपाळावर हळद-कुंकू लावून तिची पूजा केली. त्यानंतर पुरणपोळीसह गाईला आवडणाऱ्या विविध पदार्थांचे जेवण तिला दिले.