सोलापूर जिल्ह्यातील घोटी येथील जिल्हा परिषद शाळेत दोन महिन्यांपासून शिक्षक नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. कायमस्वरूपी शिक्षकांच्या नियुक्तीसाठी विद्यार्थी आणि पालक आग्रही असून, पालक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. प्रशासनाने तातडीने शिक्षकांची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.