सोलापूरात दीड महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी पावसाचे आगमन झाले. शहरातील विडी घरकुल भागातील अनेक भागात त्यामुळे पाणी साचायला सुरुवात झाली. मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. सोलापूर जिल्ह्यात परवापासून पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला होता. मात्र काल पावसाने दमदार हजेरी लावल्याने सोलापूरकर सुखावले आहेत.