मार्च महिना संपत आला असून उन्हाचा तडाखा आता जाणवू लागला आहे. वाढत्या तापमानासोबतच अंगाची लाहीलाही होत असताना, सर्वसामान्यांच्या पसंतीचा आणि 'गरिबांचा फ्रीज' म्हणून ओळखला जाणारा मातीचा माठ आता करमाळा बाजारपेठेत दाखल झाला आहे.