सोलापूर : करमाळा तालुक्यातील पांगरे येथे आयोजित करण्यात आलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियाना'च्या निमित्ताने प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यातील एक अनोखे नाते पाहायला मिळाले. या अभियानासाठी उपस्थित राहिलेल्या करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची पांगरे ग्रामस्थांनी फुलांनी सजवलेल्या बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक काढली. प्रशासकीय अधिकाऱ्याचा असा अनोखा सन्मान झाल्याने संपूर्ण तालुक्यात याची चर्चा रंगली आहे.