सोलापूरच्या माढ्यात तुकाराम मुंढेंच्या सन्मानार्थ शेतकऱ्यांकडून त्याच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. अन्न औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार घेतल्यापासून धाड टाकण्याचे सत्र तुकाराम मुंढेनी सुरु ठेवलं आहे. भेसळ कमी होऊन दूधाला 100 रुपये दर नक्कीच मिळेल,असा शेतकऱ्यांनी विश्वास व्यक्त केला.