पंढरपूरच्या माघीवारीनिमित्त सोलापुरात पहिले गोल रिंगण मोठ्या उत्साहात पार पडले. नार्थकोट प्रशालेच्या प्रांगणात संत ज्ञानेश्वर, तुकाराम, मुक्ताई यांच्या पालख्यांच्या उपस्थितीत शेकडो भगवे ध्वज घेतलेल्या वारकऱ्यांनी यात सहभाग घेतला. मृदंग वादक आणि डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला भगिनींनी सोहळ्याची शोभा वाढवली. सोलापूर ते पंढरपूर या २०० वर्षांच्या माघवारी परंपरेतील हा महत्त्वाचा टप्पा आहे.