सोलापूर दौऱ्यावर आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या गाडीचे सारथ्य आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. सोलापूर महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी चव्हाण हे शहरात होते. यामुळे एका आमदाराने प्रदेशाध्यक्षांच्या वाहनाचे स्टेरिंग हाती घेतल्याचे चित्र राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. हे भाजपमधील एकीचे व समन्वयाचे प्रतीक मानले जात आहे.