सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शांतता राखण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी ५३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. मतमोजणीपर्यंत त्यांना निवडणूक कार्यक्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई आहे. मात्र, १५ जानेवारी रोजी मतदानासाठी त्यांना दोन तासांची सूट मिळेल. ज्यांच्यावर दोनपेक्षा जास्त गंभीर गुन्हे आहेत, त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.