राज्यभरात महाशिवरात्रीचा उत्साह वाहत असून सोलापूरच्या माढ्यातील शिवकालिन महादेव मंदीरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी झाली. मंदिराला हजारो वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी पुरातत्व विभागाने लक्ष घालून शहराच्या सौंदर्यात भर पाडावी अशी मागणी मंदिराच्या ट्रस्टीसह माढेकरांच्या वतीने केली जात आहे.