सोलापूरातील बार्शीच्या पानगावात घोड्यावरील वरात थेट मतदान केंद्रात नेत नवरदेवाने आज मतदानाचा अधिकार बजावला आहे. पानगाव येथील आनंद जयराम मोरे यांच्या कृतीमुळे सर्वत्र त्यांची चर्चा रंगली आहे. आनंद जयराम मोरे हे प्रशिक्षणार्थी बीडीओ म्हणून कार्यरत आहेत, मात्र विवाहासाठी ते गावी आले होते. मतदानाबाबत जागृती व्हावी म्हणून त्यांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावत मतदान किती महत्वाचे आहे याचे उदाहरण प्रसुत केले आहे.