दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी येथे पावसाची जोरदार बॅटिंग दिसून आली. खराब रस्त्यात पावसाचे पाणी साचल्याने ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील खलाटे वस्ती, चेंडके वस्ती, भालेकर वस्ती, चिवरे वस्तीकडून वडजी गावात येण्यासाठीचा रस्ता खराब आहे. वडजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी जवळपास 25 ते 30 विद्यार्थी दररोज ये जा करीत असतात. मात्र मागील काही दिवसांपुर्वी याच मार्गावरील रस्ता वाहून गेल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना प्रवास करताना नाहक त्रास होत आहे. दरम्यान सध्या रस्त्यावरून जात असलेल्या पावसाच्या पाण्यातुन शाळेतील लहान विद्यार्थ्यां आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. याच रस्त्याकडे ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार गावातील नागरिकांतून होत आहे.