करमाळा तालुक्यातील पाथुर्डी गावचे ग्रामदैवत श्री चांदखणबाबा महाराज यांच्या 25 व्या मूर्ती प्राणप्रतिष्ठादिनानिमित्त 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी श्री चांदखणबाबा महाराज यांच्या मूर्तीला आकर्षक अशी फुलांची व फळांची आरास करण्यात आली होती.किर्तन,प्रवचन,भारुड,आदी धार्मिक कार्यक्रमाचे करण्यात आले होते. यावेळी पंचक्रोशीतील महिलांसह ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.